एक मतदारसंघ मुख्यमंत्री ठरवणार नाही !

राष्ट्रवादी श.प.ला उबाठा शिवसेनेचा चिमटा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2024 11:56 AM
views 50  views

  • इथला मतदार शिवसेनेसोबत : बाबुराव धुरी 

सावंतवाडी : इथला मतदार शिवसेनेसोबत असून हा मतदारसंघ आम्हालाच मिळेल. पण, महाविकास आघाडीचे काही प्रमुख पदाधिकारी या मतदारसंघावर दावा करत आहेत तो पूर्णतः चुकीचा आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही भुमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना धन्यवाद देतो. मात्र, सावंतवाडीच्या एका जागेवर कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र ते ठरवणार आहे‌ अशा शब्दांत उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सावंतवाडीवर उबाठा शिवसेनेचा दावा कायम ठेवला आहे. 

ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून निवडणूका लढविल्या जात आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे यासाठीची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इथला मतदार शिवसेनेसोबत असून हा मतदारसंघ आम्हालाच मिळेल. महाविकास आघाडीचे काही प्रमुख पदाधिकारी या मतदारसंघावर दावा करत आहेत तो पूर्णतः चुकीचा आहे. आम्ही एकसंघ आहोत. वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. पण, मागचा दोन टर्म इथे शिवसेनेचा आमदार निवडून आल्याने त्याच पक्षाला उमेदवारी मिळावी ही आमची मागणी आहे व तसा फॉर्म्युला आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळेल व वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल असंही श्री. धुरी यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही भुमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे धन्यवाद देतो. पण, सावंतवाडीच्या एका जागेवर कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र ते ठरवणार आहे‌. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यावर निर्णय घेणार असून शिवसेनेला जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. स्थानिकांना उमेदवारी द्यावी ही आमची मागणी आहे. पक्षप्रमुख आदेश देतील तो मान्य असेल असा पुनरुच्चार केला.राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून जागृती होत आहे‌. महाराजांचा विचार घेऊन चालणाऱ्या यात्रेला आमच्या शुभेच्छाच राहतील असे सांगितले.


दरम्यान, जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशत पसरविण्याचे काम होत आहे. दहशतवादावर बोलणारे दीपक केसरकर आज शांत का आहेत ?. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील घटनेवर ते बोलत नाही आहेत. नारायण राणेंच्या दबावाखाली ते दबले गेले आहेत. आजवर कधीही बाऊंसर घेऊन टेंडर मॅनेज करण्याचा प्रकार कधीही घडलेला नाही. ही गोष्ट लाजीरवाणी आहे असं मत व्यक्त केले. जिथे प्रकार घडला तिथे प्रशासक कार्यरत आहे. राडा कोणामुळे झाला हे प्रशासनाने बघितलं पाहिजे. ते बाऊंसर तिथे का आले ? कामकाजात त्यांनी हस्तक्षेप का केला ? याचा पोलिसांकडून तपास होण आवश्यक होतं. मात्र, तसं न झाल्याने जिल्हा परिषद समोर ७ ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.


केसरांवर खालच्या पातळीवर बोललो नाही, बोलणार नाही. वयाचा विचार करून ते करणार नाही. पण, पक्ष म्हणून आमची भूमिका ठाम राहील. त्यांनी कौतुक केले तरीही. आमच्याकडे पाच उमेदवार आहेत. केसरकर बलाढ्य असते तर इथल्या रूग्णांना व युवकांना गोव्याची वाट धरावी लागली नसती. दीपक केसरकर वारस जाहीर करणार असं म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी वारस म्हणून आम्हाला जाहीर करून राजकीय निवृत्ती घेत मार्गदर्शन करावं असा सल्ला दिला. शिवसेनेत कोणत्याही प्रकारचे गटतट नाहीत. जनतेला न्याय देणं हेच आमचं म्हणणं आहे. संदेश पारकर यांच्याकडे काही लोक न्याय मागायली गेली. त्यानंतर त्यांनी सासोलीच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी हे आंदोलन पक्षाच नसून पारकर यांच असल्याचा खुलासा मी केला. सासोलीच्या ग्रामस्थांसह मी कालही होतो, आहे अन् राहणार आहे. आमच्याकडून हा प्रश्न सुटत नाही असं वाटल्याने ती मंडळी राजन तेली यांच्याकडे गेली. तिथून प्रश्न न सुटल्याने पालकमंत्री यांच लक्ष वेधलं. तदनंतर नारायण राणेंकडे गेली अन् शेवटी संदेश पारकर यांच्याकडे ही मंडळी गेली. कोणाच्याही माध्यमातून हा प्रश्न सुटावा हीच माझी इच्छा आहे असं ते म्हणाले. यावेळी उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, श्री. परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.