
वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान विठ्ठल साटेलकर यांनी आज १७ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.याबाबत त्यांनी याबाबत जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे राजीनामा पत्र दिले आहे. प्रदेश नेतृत्वावर नाराज होऊन राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने व वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने काम करणे कठीण झाले आहे.गेली सुमारे पंधरा वर्षे एकनिष्ठपणे काम करूनही प्रदेशवरून दुर्लक्ष झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.