NCP कडून भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचं वाटप...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 13:59 PM
views 298  views

दोडामार्ग : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र ,कर्नाटक व गोवा या राज्यांचा सीमांवरील असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची प्रमुख उपस्थितीती होती.

अतिशय दुर्गम भागाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या या शहरात पावसाचे प्रमाण देखील अधिक असते. वर्षभर ऊन, वारा, पाऊस यांपासून या विक्रेत्यांचे रक्षण व्हावे हाच, या छत्री वाटपाचा मुख्य हेतू आहे असं मत अर्चना घारेंनी व्यक्त केल.

याप्रसंगी दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, जिल्हा सरचिटणीस संदीप गवस, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष कृष्णा नाईक, विलास सावळ, सुभाष लोंढे, उल्हास नाईक, कृष्णा कुंभार, केर माजी सरपंच विष्णू देसाई, सागर नाईक, गौतम नाईक, रविंद्र बांदेकर, नागेश तुळसकर, चंद्रसेन गवस आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.