
कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या एन.सी.सी. विभागा तर्फे एन.सी.सी. दिनाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त महाविद्यालयात एन.सी.सी ध्वजाला मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयाच्या सेमिनार हॅाल मध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॅा.शुभांगी देशमुख, स्वाड्रन लिडर(निवृत्त) तसेच इ.सी.एच.एस.मिलटरी हॅास्पिटल ओरोस च्या प्रमुख या प्रमुख अतिथी , व कर्नल दीपक दयाल(सेना मेडल)कमाडिंग ॲाफिसर ५८ बटालियन ओरोस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एन.सी.सी विभाग प्रमुख डॅा.कॅप्टन एस.टी.आवटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॅा.देशमुख यांनी करिअर साठी सुरक्षा विभागातील सेवा ही सर्वोत्तम निवड असल्याचे अनेक उदाहरणासहित सांगितले. तसेच आपली हवाई दलातील भरती प्रक्रियेची माहिती कॅडेटसना दिली.
विशेष अतिथी कर्नल दिपक दयालजी नी एन.सी.सी.चा इतिहास सांगत एन.सी.सी ही जगातील १८लाख गणवेशधारी युवकांची एकमेव संघटना असल्याचे नमूद केले.तसेच प्रत्येक युवकाला वर्तमान मध्ये जगात सुरक्षेच्या दृष्टिने घडत असलेल्या घटनांची माहिती असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा.स्मिता सुरवसे यांनी एन.सी.सी.दिनाच्या कॅडेटना शुभेच्छा दिल्या व एन.सी.सी.चे व्यक्तिमत्व विकासासाठी चे महत्व विशद केले. विद्यार्थी दशे मध्ये प्राप्त होणाऱ्या प्रत्येक संधी चा लाभ घेऊन व्यक्तिमत्व विकसीत करण्याचा सल्ला दिला व मोबाइलचा सकारात्मक वापर करण्यास सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेट सुचिता मांजरेकर ने उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. पाहुण्यांची ओळख कॅडेट पृथ्वी देसाई ने करुन दिली व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कॅडेट श्रुतिका घाडी हिने केले. या कार्यक्रमासाठी सर्व एन.सी.सी कॅडेटस व महाविद्यालयाचा प्राद्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.