नवोदयच्या प्राचार्यांना नितेश राणेंनी झापलं

परीक्षार्थी मुलांची व्यथा ऐकून चढला पारा मस्ती खपवून घेतली जाणार नाही : नितेश राणे
Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 08:04 AM
views 192  views

सावंतवाडी : सांगेली नवोदय विद्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेच्या प्रकारानंतर भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पालकांशी देखील संवाद साधला. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान, रूग्णालयात दाखल असलेल्या काही मुलांची दहावीची परीक्षा सोमवारी असून रात्री उशीरापर्यंत विद्यालयाकडून त्यांना पुस्तक मिळाली नव्हती. याबाबत मुलांनी नितेश राणेंकडे व्यथा मांडता ते चांगलेच संतप्त झाले. या विद्यार्थ्यांना त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्या अशा सूचना त्यांनी प्राचार्यांना फोनवरून केल्या. तर तुमची ही मस्ती खपवून घेतली जाणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो अशी तंबी देत राणेंनी प्राचार्यांना चांगलंच झापलं.

तुम्ही मुलांना दिलेलं अन्न खाल्ल होत का ? असे खडेबोल राणेंनी यावेळी सुनावले‌‌. विद्यार्थ्यांच्या जीवाच बरं वाईट झालं असतं तर जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी प्राचार्यांना केला. प्रशालेतील मुलांच्या जेवणाबाबत एवढी हयगय आपण कशी काय करू शकता ? असा सवाल त्यांनी यावेळी प्राचार्यांना केला. शनिवारी रात्री ९ वाजता नितेश राणेंनी रूग्णालयात येत विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी उपचार घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची सोमवारी दहावीची परीक्षा असून त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती राणेंना केली. प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे अद्याप पुस्तक प्राप्त झाली नाहीत असं ती मुलं म्हणाली. यावेळी नितेश राणे चांगलेच संतापले‌. त्यांनी प्राचार्यांना फोन करत चांगलेच खडसावले. विद्यालय प्रशासनात चाललेल्या कारभाराबाबत त्यांनी प्राचार्यांना धारेवर धरल. तुमचा  हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अस आमदार नितेश राणे म्हणाले. यावेळी उपस्थित पालकांनी विद्यालय प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यात सुधारणा होत नाही. जिल्हाधिकारी यांच देखील आम्ही लक्ष वेधलं होत. परंतु, कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. अन्यथा आज ही वेळ आमच्यावर आली नसती अशी भावना पालकांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, केतन आजगावकर, विनोद सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.