
सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी नवदुर्गा उत्सवाचे ओचित्य साधून *सन्मान नारीचा – सन्मान नवदुर्गांचा* हा विशेष गौरव सोहळा नुकताच इन्सुली येथे यशस्वी रित्या आयोजन करून नारिशक्तीला सन्मानित केलं. १६ गावांतील ६७ महिलां यां सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर, वकील, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अशा अशा पदांवर काम करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच समाजाचा सन्मान असल्याचे सांगितले. त्यांच्याच संकल्पनेतून हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी गो सोर्स आयटी कंपनीच्या डायरेक्टर ऐश्वर्या कोरगावकर यांनी महिलांना व्यावसायिक क्षेत्रात मार्गदर्शन केले. तर सन्मानाला उत्तर देताना बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट यांनी “हा सत्कार म्हणजे प्रयत्नांना मिळालेली शाबासकीची थाप” असे मत व्यक्त केले.
या सोहळ्याला अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, नरेश शेट्ये, गुरुनाथ पेडणेकर, अशोक सावंत यांसह सरपंच प्रियांका नाईक, प्रांजल जाधव, नयना देसाई, रेश्मा सावंत, विराज परब, बबिता गवस आदी मान्यवर उपस्थित होते.










