
दोडामार्ग : गिरोडे येथील श्री सातेरी शांतादुर्गा नवरात्रौत्सव, गिरोडे वर्ष २ रे यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यावेळी अनेक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आले. या कार्यक्रमांचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गिरोडे ग्रामस्थांनी केले आहे.
यावेळी पहिला दिवशी सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. आरती व पुजा तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, संध्या. ०४ वा. फुगडी, रात्रौ ०८ वा. - शांतादुर्गा भजनी मंडळ गिरोडे यांचे भजन, दुसरा दिवस मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ०७.३० वा-बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. तर तिसऱ्या दिवशी बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा. फुगडी कार्यक्रम, रात्रौ ०७.३० वा- घुमट आरती मंडळ गिरोडे, चौथ्या दिवशी गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ०७.३० वा भजन, पाचवा दिवस शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. - पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा. भजन कार्यक्रम, रात्रौ ७ वा दांडीया स्पर्धा, सहाव्या दिवशी शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.- पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ०७ वा दांडीया स्पर्धा, सातवा दिवस रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. - पुजा व आरती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा.- फुगडी कार्यक्रम, रात्रौ ०७.३० वा- दांडीया स्पर्धा, आठवा दिवस सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुजा व आस्ती व तिर्थप्रसाद, संध्या. ०४ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ०८वा, नववा दिवस मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पुजा व आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ वा महाप्रसाद, संध्या. ५ वा भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ०७.३० वा-श्री देवी भुमिका दशावतार नाट्य मंडळ, नितिन आसयेकर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.