
सावंतवाडी : सावंतवाडीकरांची पाडवा पहाट योगेश रामदास यांच्या सुश्राव्य संगीताने झाली. श्रीपाद चोडणकर यांच्या पुढाकाराने व न.प. सावंतवाडीच्या सौजन्याने 'नवरंग पाडवा पहाट' च आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे १९ वे वर्ष होते.
भल्या पहाटे मोती तलाव काठावर ही मैफील रंगली. पहाटे ५.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर समोर, सावंतवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. बेळगांव येथील गायक योगेश रामदास यांनी सदाबहार अशी भावगीत, भक्तीगीते सादर केली. त्यांच्या सुमधुर संगीताने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.यावेळी हार्मोनियम साथ निलेश मेस्त्री, तबला किशोर सावंत,निरज भोसले यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन गौरवी घाटे हीने केलं. याप्रसंगी श्रीपाद चोडणकर, बाळ पुराणीक, अँड. बापू गवाणकर, प्रा. केदार म्हसकर आदींसह नवरंग परिवारातील सदस्य उपस्थित होते.