निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर १ ऑक्टोबरला मालवणात मार्गदर्शन...!

Edited by:
Published on: September 28, 2023 11:24 AM
views 194  views

मालवण : अनेक छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. मात्र याच औषधी वनस्पतीच्या आधारे घरगुती उपाय करता येतात. याच दृष्टीने मनसेतर्फे आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते,माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

मालवण येथील मनसेच्या राजगड या तालुका कार्यालयात परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. त्यावेळी मनसेचे विनोद सांडव, प्रतीक कुबल आदी उपस्थित होते. 

अनेक छोट्या आजारांवर उपचाराची सोय दिसून येत नाही. या आजारांवरील उपचारसाठी लोकांना डॉक्टरकडेच जावे लागते. त्यामुळे ही बाब खर्चिकही पडते. त्यामुळे काही घरगुती उपायांमुळे काही आजार बरे होत असतील तर लोकांचा खर्च वाचेल. त्यामुळे या उपायांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे,त्यांदृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.