नैसर्गिक रानभाज्या हा आपल्या आहारातील महत्वाचा मेनू | सरपंच नयना देसाई यांचं प्रतिपादन

Edited by: संदीप देसाई
Published on: August 08, 2023 20:41 PM
views 99  views

दोडामार्ग : आजच्या रासायनिक जमान्यात नैसर्गिक रानभाज्या हा आपल्या आहारातील महत्वाचा मेनू असला पाहिजे. जून ते सोनं मानून आपल्या आहारात पूर्वीपासून जो रानमेवा वापरात आहे तो नियमित सेवन केल्यास नीच्छीतच आपण निरोगी आयुर्मान जगू शकतो असे प्रतिपादन पडवे माजगाव च्या सरपंच नयना देसाई यांनी केलं.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवे माजगाव येथे रान भाजी महोत्सव व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमात मुले व पालकांना रान भाज्यांची ओळख व आहारात त्यांचं महत्व पटवून सांगण्यात आले. कार्यक्रमाला गावच्या सरपंच नयना देसाई, उपसरपंच देसाई  व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष अशोक देसाई, गावचे पोलीस पाटील अरविंद देसाई शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भाईप व कृषी पर्यवेक्षक श्री. घाडगे  व कृषी सहायक अतुल माळी यांसह पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रम निमित्ताने विद्यार्थी व पालक वर्गाने नैसर्गिक रानभाज्या उपलब्ध करून त्याचं प्रदर्शन भरविण्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनती बद्दल सरपंच नयना देसाई यांनी सर्वांचे कौतुक केले.