राष्ट्रवादी महिला आघाडी अजित पवार गटाची कार्यकरिणीसंदर्भात आढावा बैठक

Edited by:
Published on: January 08, 2024 14:29 PM
views 112  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला आघाडी अजित पवार गटाची तालुका आणि शहर कार्यकरिणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.  राष्ट्रवादी महिला आघाडीची तालुका तसेच शहर कार्यकारिणी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सावंतवाडी तालुका आणि शहर कार्यकारिणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील महिलांच्या अन्य विषयावर चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे दिनांक १८ जाने.२०२४ रोजी षण्मुखानंद हॉल दादर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष  रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंभर ते दीडशे महिला सहभागी होणार आहेत तसेच त्यांच्यासाठी जिल्ह्यातून बस सोडण्यात येणार असून सर्व सोय राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत मोफत करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीला सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा सौ. रिद्धी रोहन परब, शहाराध्यक्षा सौ. रंजना निर्मळ, महिला कार्यकारिणी सदस्य सौ. जानकी नाईक, रिया खोटलेकर, रुपाली कदम, लता जाधव, काजल सावंत, बांदा येथून राधिका गवस, तसेच 

प्रदेश चिटणीस  एम.के.गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष विजय कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.