एकात्मिक शेती आणि पशुधन क्लस्टरवर ओरिएंटेशन कम इंडक्शन" या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 19:43 PM
views 208  views

सावंतवाडी : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील एकात्मिक शेती आणि पशुधन क्लस्टरवर ओरिएंटेशन कम इंडक्शन" या विषयावर कार्यशाळा 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपन्न होत आहे.

या कार्यशाळेसाठी रमण वाधवा उपसंचालक राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान दिल्ली, डॉक्टर विवेक कुंज राष्ट्रीय अभियान व्यवस्थापक उपजीविका, डॉक्टर प्रदीप कुमार पांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तराखंड, शितल कदम उपसंचालक कृतीसंगम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोमनाथ चौधरी अभियान व्यवस्थापक उपजीविका दिल्ली डॉ.उदय पाटील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग डॉ.राजेंद्र  बांबल अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन दिल्ली, बजरंग पटनाईक राष्ट्रीय अभियान व्यवस्थापक दिल्ली व इतर 13 राज्यातील राज्य अभियान व्यवस्थापक, अभियान व्यवस्थापक, युवा व्यवसायिक  कार्यशाळेसाठी सहभागी झाले.

ही कार्यशाळा तीन दिवसांमध्ये संपन्न झाली. यामध्ये एकात्मिक शेती प्रभाग नियोजन प्रक्रिया उपजीविका सेवा सल्ला केंद्र व्यवसाय आराखडा पिकांची निवड पशुधन प्रभाग उत्पादक गट व त्यांचे व्यवसाय आराखडे याविषयी सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहभागी झालेल्या राज्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात असणारे सद्यस्थितीतबाबत व व्यवसाय वृद्धीसाठी नियोजन बाबत माहिती दिली. तसेच कार्यक्षेत्र भेटसाठी सावंतवाडी तालुक्यातील जिजाऊ महिला प्रभाग संघ आरोंदा, अनमोल प्रभाग संघ तळवडे तालुका सावंतवाडी येथे भेट देण्यात आली.