पल्लवी गोसावी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 16, 2023 12:51 PM
views 138  views

सिंधुदुर्ग : खोसला प्रोफिल प्रा. ली. येथे एचआर म्हणून कार्यरत असणाऱ्या पल्लवी गोसावी यांना दुधारे स्पोर्ट फाउंडेशन, नाशिक यांचा स्वामी संविदानंद सरस्वती राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ रोजी स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते कैलाश मठ, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आला.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उत्तराखंड येथील भुवनेश्वर मियाळ (पूर्व धर्मधिकार, बद्रीनाथ धाम), मुकुदानंद ब्रह्मचारी (स्वामी शंकराचार्य शिष्य), अशोक कदम जिल्हाध्यक्ष अ.भा.म. महासंघ नाशिक ग्रामिण, दिपक पाटील, जिल्हाध्यक्ष क्रीडा विभाग अ.भा.म. महासंघ नाशिक व अशोक दुधारे आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते.


पल्लवी गोसावी ह्या मुळच्या कोल्हापूरच्या त्या जिम्नास्टिकच्या  उत्कृष्ट खेळाडू असून त्या जंप रोप आणि सूर्यनमस्कार च्या पंच म्हणून काम पाहत आहेत.

त्या स्वतः उत्कृष्ट खेळाडू तर आहेतच पण त्या उत्कृष्ट Exhibitor पण आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक जागी कृषी प्रदर्शन भरवलीत, महिलांच्या करिता अनेक उपक्रम राबवले. 

त्या ठाणे येथे असलेल्या खोसला प्रोफिल येथे HR म्हणून काम पाहत आहेत. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी किंवा आपल्या खेळाला बगल दिलेली नाही. स्वतःची आणि घराची जबाबदारी सांभाळत त्यांनी आपली  आवड जोपासली. ह्यांनी सामाजिक क्षेत्र कला क्षेत्र, खेळ  क्षेत्रामधील कामगिरी लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना त्यांच्या आई-वडिल, त्याचे कुटुंबीय, अशोक दुधारी, शेषनारायण लोंढे, दीपक निकम, प्रमोद खोसला, राज खोसला, सुधांशू व्यास, वेलमुर्गन, संजय सिंग, संजय पानसरे यांचे आशीर्वाद लाभले आणि मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.