
दोडामार्ग : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स, कुडासे प्रशालेत राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे सचिव, राष्ट्रीय कबड्डी पंच दिनेश चव्हाण हे होते यावेळी व्यसपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. एस. परब मॅडम, ज्येष्ट शिक्षक एस. व्ही. देसाई, पी. बी. किल्लेदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख जे. बी. शेंडगे सर होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दिनेश चव्हाण सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती विद्यार्थाना दिली. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 आणि 1936) नोंदवली आहे. अनेक दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवशी क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह प्रमुख क्रीडा संबंधित पुरस्कार प्रदान करतात.
खेलरत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असं असणार आहे. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांच्याच कार्याच्या स्मरणार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांनी तर प्रस्तावना जे. बी. शेंडगे यांनी केली. आभार एस.व्ही.देसाई यांनी मानले.