नॅशनल इं. मिडियम स्कूल नडगिवेत जागतिक योग दिन उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 21, 2023 17:34 PM
views 190  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन  सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे येथे जागतिक योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते . प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर मौन ध्यान ,प्राणायाम, विलोम अनुलोम, भ्रामरी यासारखी आसने विद्यार्थ्यांनी केली त्यानंतर  विद्यार्थ्यांकडून पूरक यायाम करून घेतले. 

या प्रसंगी विद्यार्थांनी  सामूहिक सूर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक केले त्यानंतर ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन,वज्रासन यासारखी विविध आसने केली क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर यांनी योग दिनाचे महत्व विशद केले. माणसाच्या आयुष्यात योग साधना करण्याचे महत्व व योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश यांचे विश्लेषण केले. त्यावेळी इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरले.

प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी योग दिनाचे महत्व विशद करत विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संकल्प करून शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली . योगासने व योगप्रात्यक्षिके  सादरीकरणासाठी क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर ,एकनाथ धनावटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.