नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे विभागीय सेपक टकरा स्पर्धेत घवघवीत यश

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 25, 2023 17:15 PM
views 77  views

कणकवली : नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे विभागीय सेपक टकरा स्पर्धेत घवघवीत यश सातारा जिल्ह्यातील  दहीवडी कॉलेज दहीवडी येथे  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद सातारा द्वारा आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या विभागीय सेपक टकरा स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

17 वर्षाखालील मुले गटामध्ये  द्वितीय क्रमांक पटकावीला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अमोल चौगुले व सुयोग राजापकर तसेच एकनाथ धनावटे यांचे प्रशालेचे मुख्याध्यपक कौस्तुभ देसाई यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेछा दिल्या.