
वैभववाडी : आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' या विषयावर शुक्रवार १४ व शनिवार १५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. रवींद्र बांबर्डेकर, डॉ. माधव राजवाडे, डॉ. हिरेन दंड हे उपस्थित राहून मार्गदर्शक करणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला करुन देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकिरी व शासकीय व निमशासकीय संस्था यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे व कार्यशाळा समन्वयक प्रा. सचिन पाटील यांनी केले आहे.