श्री भगवती हायस्कुल मुणगे आणि शेठ म.ग. हायस्कुल प्रथम !

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 06, 2023 19:58 PM
views 145  views

देवगड : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण नुकतेच संपन्न झाले. सदर सादरीकरणातून लहान गटात शेठ म.ग.हायस्कूल देवगडची अनुष्का व आयेशा दामोधर प्रथम तर मोठ्या गटात भगवती हायस्कूल मुणगेचे देवांग मेस्त्री व श्रेयस सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली तीस वर्षे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ आयोजित केली जाते.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या वर्षीची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषद ही ऑनलाईन संपन्न झाली. या उपक्रमात १० ते १७ वयोगटातील ३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय ‘आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे’ हा होता.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – लहान गट- प्रथम क्रमांक कु. अनुष्का विजय दामोधर व आयेशा विजय दामोधर (शेठ म. ग. हायस्कूल, देवगड). द्वितीय क्रमांक – विभव विरेश राऊळ व पार्थ विश्राम गावकर (मदर क्विंन्स इंलिश स्कूल, सावंतवाडी) तृतीय क्रमांक पौर्णिमा भिमाप्पा बाबजी व श्रेया शामसुंदर गावडे. (मदर क्विंन्स इंलिश स्कूल, सावंतवाडी) मोठा गट प्रथम क्रमांक कु. देवांग रघुनाथ मेस्त्री व कु. श्रेयस सुरबा सावंत (श्री. भगवती हायस्कूल, मुणगे), द्वितीय क्रमांक – युक्ता प्रसाद सापळे व जान्हवी पवन कुडतरकर (मदर क्विंन्स इंलिश स्कूल, सावंतवाडी), तृतीय क्रमांक कु. पियुषा उमाजी राणे व राहिन रिझवान करोल (मदर क्विंन्स इंलिश स्कूल, सावंतवाडी) सर्व सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे जिल्हा शिक्षण विभाग सिंधुदुर्गच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. प्रदीपकुमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनि अभिनंदन करुन पूढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धेचे संयोजन जिल्हा समन्वयक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.