राष्ट्रीय पुरस्कार विजेते, निसर्गोपचार तज्ञ, व्याख्याते स्वागत तोंडकर उद्या सिंधुदुर्गात..!

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती | घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन केले जाणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 30, 2023 14:44 PM
views 251  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते, निसर्गोपचार तज्ञ व सुप्रसिध्द व्याख्याते स्वागत तोंडकर मामा वरेरकर नाट्यगृह मालवण उद्या १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येणार आहेत.या कार्यक्रमात रुग्णांना मोफत सल्ला निसर्ग उपचार तज्ञ,व्याख्याते स्वागत तोंडकर देणार आहेत.रुग्णाच्या समस्या जाणून घेत मोफत सल्ला देणार आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

रुग्णांच्या समस्या बाबत आरोग्य धनसंपदा हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. निसर्ग उपचार,घरघुती उपचार करुन आजार बरे होवू शकतात.बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे आरोग्य उपचार सेवा स्वागत तोडकर देत आहेत.या कार्यक्रमाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेवा,माजी आ.परशुराम उपरकर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.