कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मंगळवारी गणेशोत्सवच्या शुभदिनी महीलांसाठी "नारी शक्ति वंदन विधेयक " लोकसभा आणी विधानसभेत ३३% जागा आरक्षण मंजुरीसाठी आणले, आणी नारी शक्ती साठी विकासाचे द्वार उघडले. मागची २७ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.आता एक तृतीयांश जागा यापुढे महिला प्रतिनिधित्व करतील.जिथे ८२ महिला लोकसभेत आहेत तिथे त्या १८१ होतील इतका मोठा बदल नुतन सभागृहात दिसेल आणि तो प्रभाव पुढील १५ वर्षे असेल. यामुळेच हे मोदीजींच कार्य देशातील महिलांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
यापूर्वीच मुस्लिम महिलांसाठी तिन तलाक विरोधात कायदा संमत करून मोदीजींनी महिलांचा विश्वास संपादन केला आहेच. मातांसाठी मोदीजींनी यापूर्वीच मैटर्निटी बेनिफिट (एमेंडमेंट) बिल या मातृत्व लाभ (संशोधन) बिल आणत महीलाबद्दलची आस्था दर्शवत कर्मचारी महिलांना माता बनल्यानंतर सहा महिने रजा घेऊ शकतील असा कायदा केला.
आता तर 'सुकन्या समृद्धी योजनें'तर्गत दहा वर्षांखालील मुलीचे खाते उघडून त्यावर 7:5% व्याज मिळून तिच्या २१ व्या वर्षीच तिच्या लग्न समयी पुर्ण रक्कम मिळू शकते अशी तरतूद मोदीजींनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' याकरिता केली आहे. या शिवाय महिला जनधन योजनेंतर्गत खाते उघडून दोन लाखांच्या विमा ची मोफत तरतूद केली यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा विस्तार करीत आता देशातील 75 लाख महिलांना याचा लाभ होईल आणि त्यांची धुरापासुन सुटका होईल. मोदीजींचा हा मास्टर स्ट्रोक महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी निर्णय ठरणार आहे.