नारायण राणेंचं सिंधुदुर्गात पर्वतापेक्षा मोठं काम : संजू परब

वाढदिवसानिमित्त खास नाट्य महोत्सव
Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2025 13:33 PM
views 220  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात खासदार नारायण राणे यांचे पर्वतापेक्षा मोठं काम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाट्य महोत्सव भरवून दशावतारी केलेला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. शहरातील लोकांना दशावतार नाट्य महोत्सवाचा आस्वाद त्यामुळे निश्चितच घेता येईल याचा आम्हाला आनंद वाटतो असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, विनोद सावंत, पत्रकार अँड संतोष सावंत, पत्रकार हरिश्चंद्र पवार, विजय चव्हाण, हर्षवर्धन धारणकर, प्रल्हाद तावडे, अशोक सांगेलकर, साक्षी गवस, गजानन बांदेकर, पुजा सोन्सुरकर, प्रताप परब, शशिकांत मोरजकर आदी उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजू परब यांची निवड झाली त्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अँड संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. सौ. साक्षी गवस व सौ पुजा सोन्सुरकर यांना सह्याद्री फाउंडेशन मध्ये शुभेच्छा देण्यात आल्या.


शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाट्य महोत्सव, क्रिकेट स्पर्धा भरवून साजरा करत आहोत. दशावतारी कलावंतांना प्रोत्साहन मिळते. लोकांना दशावतार शहरात पहायला मिळतो. दशावतार कला जोपासली पाहिजे म्हणून डोंगरा एवढे काम करणाऱ्या खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक सुनील राऊळ म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाट्य महोत्सव होत आहे. नाट्य महोत्सव भरवून दशावतारी कलेला प्रोत्साहन व संजू परब यांच्या आयोजनात सहभाग घेता आला. संजू परब राजकारण, सामाजिक कार्य करताना त्यांचे दातृत्व, कर्तृत्व जनतेला भावते. खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दशावतार नाट्य महोत्सव भरवून सर्वांगीण विकासासाठी सदिच्छा देतो. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे म्हणाले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने दशावतार नाट्य महोत्सव भरवून खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देताना आनंद झाला.