नारायण राणेंच्या बांदा जि. प. मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ

Edited by:
Published on: April 25, 2024 12:41 PM
views 199  views

बांदा : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आज श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी श्रीफळ ठेऊन करण्यात आला. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने राणे यांच्या विज्यासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ. रुपाली शिरसाट, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार कल्याणकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश महाजन, सुधीर शिरसाट, निलेश देसाई, साई धारगळकर, संदीप बांदेकर, अनिकेत धोंगडे, गजानन गायतोंडे, वाफोली उपसरपंच विनेश गवस, प्रवीण देसाई, सागर सावंत, शैलेश केसरकर, मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, शिवसेनेचे भैय्या गोवेकर, भाऊ वाळके, गिरीश नाटेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, निलेश कदम, माजी सरपंच दीपक सावंत, मनोज कल्याणकर, अक्षय मयेकर, सौ. लक्ष्मी सावंत, सौ. रेश्मा सावंत, सौ. श्रेया केसरकर, सौ. दीपलक्ष्मी सावंत, शामराव सावंत यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांदा शहरात घरोघरी प्रचार करून पत्रके वाटण्यात आली.