
सावंतवाडी : दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकींसाठी व्यासपीठावरील अनेक जण इच्छुक आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा असं विधान माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील रेल्वे स्थानके सुशोभीकरण लोकार्पण कार्यक्रमात केलं.
ते म्हणाले, दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकींसाठी व्यासपीठावरील अनेक जण इच्छुक आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा. लोकांमध्ये जाऊन काम करा, वातावरण निर्मीती करा, निवडणूक आहे असं वाटलं पाहिजे. डझनभर उमेदवार सावंतवाडीत आहेत. लोकहीतासाठी कार्य करा, वैयक्तिक स्वार्थासाठी नको. तर रविंद्र चव्हाण यांनी वजनकाटा आणला आहे. ते वजनकाट्यावरून 12 पैकी एक निवडतील अशी मिश्किल टीपणी खासदार राणेंनी यावेळी केली.