खा. राणेंची कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घेतली भेट | केलं अभिनंद

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 17, 2024 05:06 AM
views 145  views

कणकवली : नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आज भेट घेतली. खासदार नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी उप कार्यकारी अभियंता के.के.प्रभू, उपअभियंता विनायक जोशी ,बांधकाम विभागाचे कर्मचारी शैलेश कांबळे, घाणेकर उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध विकास कामासंदर्भात सर्वगोड यांनी चर्चा केली. आता कणकवली रेल्वे स्टेशन व गणपती साना येथील पुलाच्या कामाची माहिती  यावेळी सर्वगोड यांनी खा. राणे यांना दिली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मार्फत होणाऱ्या कामाबद्दल यांनी समाधान व्यक्त केले.