असलदेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य : नारायण राणे

नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांचा सत्कार
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 15, 2024 10:07 AM
views 677  views

कणकवली : लोकसभा निवडणूकीत माझ्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. असलदे गाव या लोकसभा निवडणूकीत माझ्या पाठीशी राहत चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या कुटुंबातील माणसे या निवडणूकीत पाठीशी राहिली. त्यामुळे आगामी काळात असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा विश्वास असलदे ग्रामस्थांशी संवाद साधताना नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. 

  असलदे गावातील ग्रामस्थांच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री , नवनिर्वाचित खा. नारायण राणे निवडून आल्याबद्दल शाल व पुच्छगुच्छ देवून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


 यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा दळवी , आनंदीबाई खरात , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , विठ्ठल खरात , महेश लोके , मनोज लोके , दिनेश तावडे , वासुदेव दळवी, अनिल लोके , रघुनाथ लोके , प्रविण डगरे , विजय आचरेकर , संतोष हडकर , ठकोजी डामरे , जयवंत डामरे , उत्तम नरे , दिनेश शिंदे , विजय खरात , रुपेश खरात , प्रकाश शिंदे आदींसह गावातील ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी संचालक उपस्थित होते.