हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा : नारायण राणे

Edited by: विनायक गावस
Published on: April 15, 2024 06:13 AM
views 240  views

सावंतवाडी : लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य हवं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. माजगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.


लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजगाव येथील महायुतीच्या सभेत केल. मी गेली ३४ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे‌. ९० सालात कणकवली मालवणमधून आमदार झालो. पुढे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता ते केंद्रीय मंत्री अशी पद मला प्राप्त झाली. या पदांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट कसा होईल याकडे कायम लक्ष दिलं. रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्न पुर्णपणे सोडविले. सिंधुदुर्गची परिस्थिती बदलायची असा निर्धार केला. मी मुंबईतून जिल्ह्यात आलो तेव्हा इथलं दरडोई उत्पन्न ३५ हजार होत. आज २ लाख ४० हजार दरडोई उत्पन्न जिल्ह्याच आहे‌‌. ही आर्थिक प्रगती झाली.  आरोग्य, उद्योग, शैक्षणिकदृष्ट्या आपण प्रगती करत आहोत. रोजगारासाठी अनेक कारखाने इथे येणार आहेत. इथल्या युवक युवतींनी टेक्नीकल शिक्षण घ्यावं, ओरोस येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घ्याव. हे शिक्षण तुम्हाला नोकरीसह उद्योजक बनण्यासाठी उपयोगी ठरेल. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, आयपीएस अधिकारी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. तर मनीऑर्डरवर जगणाऱ्या या जिल्ह्याची पूर्ण परिस्थिती बदलायची आहे. दोडामार्गला ५०० कारखाने आणायचा माझा प्रयत्न आहे. मेडिकल व फुड प्रोसेसिंगबाबतचे उद्योग तिथे येणार आहेत. विमान, रेल्वेसह वाहतूक व्यवस्था जवळ आहे. त्यामुळे येणारा काळ बदलणार आहे असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. 


माझ्या जिल्ह्यातील तरूण- तरूणी मोठे अधिकारी बनत आहे. मुंबई, पुण्यात मोठ्या कंपन्यांत चांगल्या पदावर आहेत हे बघताना व ऐकताना होणारा आनंद शब्दांत सांगता न येणारा आहे. त्यांनी आपल्या जिल्ह्यातून शिक्षण घेत केलेली प्रगती कौतुकास्पद अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याच काम केलं. गरीब, महिला, विद्यार्थी, कामगारांसाठी कल्याणकारी काम केलं. आपली परिस्थिती बदलण्यासाठी कर्तृत्ववान पंतप्रधान आपल्याला लाभले आहे. ३४ वर्षांत कोकणची परिस्थिती बदलत आहे. पुढच्या काळात ही परिस्थिती पूर्णपणे बदलायची आहे. विरोधकांकडे नारायण राणे सोडून अन्य विषय नाहीत. केवळ टीका करण्याच काम ते करत आहेत. कोकणात परिवर्तन करू शकलो याचा आनंद आहे असं मत नारायण राणेंनी व्यक्त केल. तर मला नुसतं जिंकायचं नाही आहे. अडीच लाख मताधिक्यान निवडून यायच आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन राणेंनी केलं.याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, मनिष दळवी, संजू परब, संदीप कुडतरकर, महेश सारंग, नारायण उर्फ बबन राणे, रेश्मा सावंत, डॉ. अर्चना सावंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.