
सावंतवाडी : उपऱ्या राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करणार, तसा निर्धार शिवसेनेच्या रणरागिणींनी केला आहे. कॉग्रेसकडे एक मत नसताना मी त्याला आमदार केलं. मुंबई चार कोटीच घर कोणी दिलं ? ते त्याला विचारा.त्याला माझ्या समोर फक्त उभा राहायला सांगा, नाहीतर आता मी सावंतवाडीत असणार आहे. माझ्या रेंज मध्ये आला की तुम्हाला ब्रेकींग न्युज मिळणार असं विधान खासदार नारायण राणे यांनी केल. आज दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देत प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
तेली स्वार्थासाठी राजकारणात !
नारायण राणे म्हणाले, राजन तेली काम मिळवण, जमिनी घेण आणि फसवणूक करण यासाठी पक्षात असतो, विधायक कामासाठी नाही. लोकांच्या कामाशी त्याचा काही संबंध नाही. त्याला मी आमदार केला. त्यावेळी एक काम त्याला करता आलं नाही. तो स्वार्थासाठी राजकारणात आहे. मला बाळासाहेबांनी कोकणात पाठवलं तेव्हा दुकानात पुड्या बांधायच काम तेली करत होता. मामांकडे राहत होता, स्वतःच घरही नव्हते. सगळी पद मी दिलं. एक मत कॉग्रेसकडे नसताना मत मी मिळवली असं त्यांनी सांगितलं.
माझ्या रेंज मध्ये आला की....
तर, बीकेसीत चार कोटीच घर कोणी दिलं ? हे त्याला विचारा. माझ्यासमोर फक्त उभा रहायला सांगा. नाहीतरी मी आता सावंतवाडीत आहे. माझ्या रेंज मध्ये आला की तुम्हाला ब्रेकींग न्युज मिळणार. मी कोणाच्या अद्यादमध्यात नाही अन् मी कोणाला सोडतही नाही. मी व्यवसायातून सगळं उभं केलं आहे. राजकारणातून पैसा कमावला नाही. उपरकरकडे घर, गादी नव्हती. राहणीमान आर्थिक परिस्थिती काय होती हे मला माहित आहे. तेली आणि उपरकरकांच सगळं ठावूक आहे. राजन तेली माझ्याविरोधात बोलला तर असेल तिथे जाणार, माझे निवडणूकीत खर्च केलेले साडेतीन कोटी मागणार. नाही दिले तर तुम्हाला ठाऊकच आहे असा इशारा दिला.
तर माझ्यावर बोलला तर फटके निश्चित
दरम्यान, मी वडीलांच्या नावाने ट्रस्ट सुरू करून सामाजिक काम करत आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीयदृष्ट्या विकास करत आहे. त्यामुळे विकास करणाऱ्यांना जनतेनं प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं. तर माझ्यावर बोलला तर फटके निश्चित आहेत असा इशाराही दिला.
वैभव नाईकांना टोला
वैभव नाईक यांनी दहा वर्षात कोणतं काम केलं ते सांगावं. धनुष्यबाण हा रामाचा आहे. त्यामुळे त्या भानगडीत पडू नये. याने फक्त कोल्हापूरच्या ठेकेदाराच्या नावानं कॉन्ट्रॅक घेण्याचे काम केलं. नुसतं पैलवान असून चालत नाही अंगात रगही लागते असा खोचक टोला राणेंनी हाणला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजिन लोबो, बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.