उर्वरीत मोजणीत नारायण राणे जास्तीत जास्त मताधिक्य घेतील : विशाल परब

Edited by:
Published on: June 04, 2024 06:43 AM
views 667  views

सावंतवाडी : केंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे नवव्या फेरी अखेर १७ हजारापेक्षा जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून येतील. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली याचे हे फळ आहे.निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचे आणी कामाचे हे फळ आहे.त्याचे आपण आभार व्यक्त करून खूप खूप धन्यवाद देतो या सर्वाना आपण भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो आणी ॠण व्यक्त करतो.आणी नारायण राणे यांच्यावर प्रेम दाखवलेल्या कोकणातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो.मतदारांचे आपण हे ऋण कायम लक्षात ठेवून भाजपचे कार्यकर्ते यापुढेही जोमाने काम करतील.अशी प्रतिकीया भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीच दिली आहे.ही आघाडी बघून आपल्याला आनंद होत असल्याचेही विशाल परब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.