नारायण राणेंच्या प्रचारार्थ नीलम राणे आज वेंगुर्ल्यात !

Edited by: दिपेश परब
Published on: April 22, 2024 04:42 AM
views 36  views

वेंगुर्ले : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नीलम नारायण राणे आज २२ एप्रिल रोजी वेंगुर्ल्यात येत असून तालुक्यात ४ ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभेत सौ राणे महिलांशी संवाद साधणार आहेत. 

    या प्रचार सभा आज दुपारी १२ वाजता वराठी मंगल कार्यालय, परूळे बाजार, दुपारी ३ वाजता रेडकर हॉस्पिटल हॉल, रेडी, दुपारी ४.३० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय, वेंगुर्ला तर संध्याकाळी ६ वाजता उत्सव हॉल, तुळस याठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय आणि अन्य घटक पक्ष्यांच्या सर्व प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. तरी संबंधित ठिकाणचे भाजपा पदाधिकारी यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा वेंगुर्ला महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सुजाता पडवळ यांनी केले आहे.