
सावंतवाडी : गाफील राहू नका, दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा. मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी शिवसैनिकांना दिला. तर राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करण्याचा निर्धार महिलांनी केला असल्याचे ते म्हणाले. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी राणेंनी भेट दिली असता पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिला. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच औक्षण करत स्वागत करण्यात आले. यावेळी राणेंनी पदाधिकाऱ्यांकडून केसरकर यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला. गाफील राहू नका असा डोस पदाधिकाऱ्यांना देत दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा. मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी दिला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजिन लोबो, बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, शिवानी पाटकर, नंदू शिरोडकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.