राणे - केसरकर यांच्यात 'चाय पे चर्चा' !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2024 13:11 PM
views 387  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी प्रचाराच्या रणधुमाळीत क्षणभर विश्रांती घेतली. यावेळी राणे-केसरकर यांच्यात 'चाय पे चर्चा' झाली. शहरातील बाहेरचा वाडा माजी नगरसेवक राजू बेग यांच्या निवासस्थानासह भटवाडी येथे राणे-केसरकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पुढील दौऱ्यासाठी जात असताना त्यांनी केसरकर यांच्या निवासस्थानी क्षणभर विश्रांती घेतली. त्यानंतर राणे व केसरकर आरोंदा व बांदा येथील बैठकीसाठी रवाना होणार आहेत.