
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा विकास हवा असेल तर युती धर्म पाळून सगळ्यांनी केसरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा दोडामार्ग तालुक्याचा विकास महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे. कार्यतत्पर आमदार म्हणून दीपक केसरकरच काम करु शकतात. त्यामुळे इतरांना कोणालाही थारा देऊ नका दीपक केसरकरांसाठी झिजून काम करा असा महत्वपूर्ण संदेश दोडामार्गच्या दौऱ्यावेळी खासदार नारायण राणे यांनी भाजप सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.
शनिवारी सायंकाळी खासदार नारायण राणे यांनी भाजपच्या दोडामार्ग कार्यालय येथे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेट दिली. सर्वांनी दीपक केसरकर यांच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही जनते पर्यंत पोहचणार यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे म्हणाले की विकासाचे ज्वलंत उदाहरण जनते पर्यंत पोहचवा मतदाराला सांगा की महायुती च्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. राजन तेलीनी दोडामार्गसाठी काय दिले. कोणती विकास कामे दिली हे आज लोकांना सांगा आणि एकही मत राजन तेलींना दोडामार्ग तालुक्यात पडता नये आणि भापचे जे कोण पदाधिकारी काम करतील ना त्यांचे फोटो माझा कडे येतील त्यावेळी मी काय ते बघेलन असे वक्तव्य राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी त्यांच्या सोबत भापचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, एकनाथ नाडकर्णी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सेनेचे तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, राजू निंबाळकर, रमेश दळवी, महिला दिक्षा महालकर, सोनल म्हावळकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
आडाळी एमआयडीसीत हॉस्पिटल साठी मेडिकल तसेच 500 कारखाने हॉटेल येणार आहेत त्यामुळे बाहेरचे मोठे उद्योग याठिकाणी येणार आहेत आणि काही वर्षात हा तालुका विकसित होणार आहे असे राणे यांनी सांगितले त्यामुळे इथल्या लोकांनीही तसे बाहेरील येणाऱ्या उद्योगधंद्याना सहकार्य करायला पाहिजे तरच याठीकाणी तालुका डेव्हलप होणार आहे. म्हणून याठिकाणी इथला आमदार तसा हवा आहे सरकार तस पाहिजे तरच या जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होणार आहे. विकास नक्की होईल एकदा केसरकर यांना निवडून द्या आणि काम आहेत ती करून घ्या दोडामार्ग महायुतीची टीम चांगली आहे.
महायुती जो पाळणार नाही त्याला फटके
भाजोचे काही पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी युतीचा प्रचार करतात व ररात्रीस तेलींचा प्रचार करतात रात्रीस खेळ चाले असा प्रकार दोडामार्ग तालुक्यात सुरु आहे अस सांगितल्यावर नारायण राणे म्हणाले 23 नोव्हेंबर नंतर या प्रकारांचे सगळे फोटो माझ्याकडे येणार आहेत त्या नंतर अश्याना फटके दिले जातील असे यावेळी राणे म्हणाले. निवडणुका झाल्या नंतर पत्रकारांना हायलाईट बातम्या देऊ असेही राणे बोलता म्हणाले.