
दोडामार्ग : शनिवारी संध्याकाळी 4 वाजता येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला सर्व तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी, जि. प. प. स. सदस्य आजी माजी सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, प. स. प्रभारी, शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, वि. वि.मोर्चा आघाडी अध्यक्ष शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, वि. विकास सोसायटी चेअरमन, सरपंच, उपसरपंच, संचालक, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख सुधीर दळवी, आनंद तळणकर तालुका उपाध्यक्ष, पराशर सावंत युवा मोर्चा अध्यक्ष, सौ. दिक्षा महालकर महिलाध्यक्ष, यांनी केले आहे.