राष्ट्रवादीच्यावतीने नारायण राणेंचा सत्कार !

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 17, 2024 10:29 AM
views 289  views

कणकवली : लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या  जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने कणकवली ओम गणेश या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. 

त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के गावडे, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा परब, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब,अबिद नाईक यांच्या कन्या रिजा नाईक, पुतण्या अली नाईक, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर,राष्ट्रवादी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, राष्ट्रवादी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर,जिल्हा सचिव सुशील चमनकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, राष्ट्रवादी वैभववाङी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव विलास पावसकर, प्रविणा खानोलकर, रक्षिता गोवेकर, राष्ट्रवादी महिला कुडाळ तालुकाध्यक्ष पूजा पेडणेकर, राष्ट्रवादी महिला कणकवली तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, राष्ट्रवादी महिला सावंतवाडी तालुकाध्यक्ष रिद्धी परब, जिल्हा प्रतिनिधी रोहण परब, सुनील जंगले, राष्ट्रवादी देवगङ तालुकाध्यक्ष रशीद खान, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयङे राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, राष्ट्रवादी कणकवली युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर शहर सरचिटणीस गणेश चौगुले, चिटणीस विशाल पेडणेकर, दिनेश सावंत, बाळू मेस्त्री, नितीश सावंत आदी उपस्थित होते. त्यावेळी नारायण राणेंनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीबरोबर बोलताना सर्वांची विकास कामे पूर्ण करण्याचा शब्द दिला.