
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या ''परिवर्तन गाव विकास पॅंनल चराठाचे'' प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार नारायण वामन जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून परिवर्तन गाव विकास पॅनल चराठाच्या सरपंचासह ९ ही उमेदवार निवडून येतील तसेच मला कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास युतीचे उमेदवार नारायण जाधव यांनी केले आहे.
चराठा गावातील सुज्ञ आणि जाणकार मतदार ग्रामस्थांनी वॉर्ड क्र. १, वॉर्ड क्र. २ व वॉर्ड क्र. ३ साठी आमचा पॅंनलची निवड करुन परिवर्तन गाव विकास पॅनल, चराठासाठी उमेदवारी देऊन विश्वास दाखविला आहे. चराठा गावच्या ३ वॉर्डाच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. सावंतवाडी शहराला लागून असलेले चराठा हे गाव सुसंस्कृत आणि शांत गाव म्हणून जिल्हयात ओळखले जाते. निसर्गरम्य चराठा या गावची एक वाडी म्हणजे आजची सावंतवाडी शहर. त्यामुळे या गावच्या प्रत्येक धार्मिक, अध्यात्मिक कार्यांत सावंतवाडी शहरातील नागरिक नतमस्तक होतात. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याचा कृपाशिर्वाद या गावाला वेळोवेळी मिळाला आहे. सावंतवाडी शहराला हे गाव लागून असल्याने आज हे गाव झपाट्याने विकास पावत आहे. यशवंतराव भोसले नॉलेज सिटीमुळे हे गाव राज्यातील शैक्षणिक नकाशावर आले आहे. सिंधुदुर्गातील अटल बिहारी वाजपेयी या केंद्रशाळेची मान्यता आपल्या गावाला मिळाली आहे. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारात आज सिंधुदुर्गातील सुपुत्र असलेले सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उदयजी सामंत हे तीन मंत्री तसेच विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची संधी आज खऱ्या अर्थाने प्राप्त झाली आहे. केंद्रातही भारतीय जनता पक्षाचे सरकार असून आज जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीमंत्री नारायण राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासभिमुख नेतृत्व खऱ्या अर्थाने लाभले आहे.केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने खऱ्या अर्थाने विकासाला आता गती आली आहे. त्याचप्रमाणे केंद्राचे जलजीवन मिशन योजने अंतर्गत चराठे गावाला पहिल्या टप्प्यात पाईपलाईन दुरुस्तीसाठी ४७ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करणे, शेतकऱ्यांना विकासाचा बिंदू ठेऊन कृषी विषयक योजना गावात प्रभावीपणे राबविणे, दूग्ध विषयक माहिती देऊन गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, तसेच केंद्र शासन व महाराष्ट्रातील सर्व शासकिय योजनांची माहिती तसेच सर्व प्रकारचे दाखले ग्रामपंचायतीमार्फत देणे, घरकुलांसाठी सहाय्य करणे, गावातील शाळा सुसज्ज व उच्च दर्जाच्या बनविणे दलीत वस्तीच्या सुधारणासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, जलसंधारणाच्या कामाला गती, स्वच्छता अभियान ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करण्यावर आमचा भर राहील. माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी यापूर्वी वेळोवेळी आपल्या चराठा गावाला सरकारकडुन भरघोस निधी देऊन विकासाला प्रोत्साहन दिले आहे. आज राज्याच्या मंत्रीमंडळात सिंधुदुर्गतील तीन सुपुत्र आहेत. त्यांच्या मदतीने आपण आपल्या गावाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आपल बहुमुल्य मत परिवर्तन गाव विकास पॅनलच्या उमेदवारांना देऊन विकासाचा रथ अधिक गतीमान करतील असा दावा श्री. जाधव यांनी केले. यावेळी उमेदवार विलास परब, अमर चराठकर यांसह घराकडे गावचे ग्रामस्थ श्रीधर बोंद्रे, सुनील परब, नारायण परब (मर्ते) युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.