
कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील वैश्य वाणी समाजाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये तर सचिव पदी पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये, उपाध्यक्ष पदी पंढरीनाथ पारकर, खजिनदार मारुती मोरये, सहसचिव दिलिप फोंडके,सह खजिनदार रविराज मोरजकर, हिशेब तपासणीस कृष्णा म्हसकर अशी कार्यकारिणी असून सल्लागार म्हणून जेष्ठ मंडळी नियुक्ती करण्यात आली आहे. वैश्य समाज असलेल्या प्रत्येक वाडीतील जास्तीत जास्त सभासद घेऊन जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.