भाजपचं नमो मतदार संमेलन !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 25, 2024 12:40 PM
views 151  views

कुडाळ  : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून मागील दहा वर्षांमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. भारत आत्मनिर्भर करण्याकडे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्याला यश मिळत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम असून युवकांसाठीही भरीव योगदान दिले आहे. भारत आत्मनिर्भर झाल्यामुळे अनेक उद्योग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले आहेत. उद्योगाच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावेच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संकल्प भारतीय जनता पार्टीने दिला आहे. त्या संकल्पला सहकार्य म्हणून मोदी सरकारच्या कामगिरीवर विशेष लक्ष द्यावे आणि आपला कल द्यावा, नवमतदार युवकांनी आपापल्या गावांमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करावं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पडवे येथील नमो मतदार संमेलना दरम्यान केले.

पडवे येथील नरसिंग हायस्कूलच्या सभागृहात नमो नमो मतदार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, या संमेलनासाठी गाव चलो अभियानाचे रणजीत देसाई, नगरसेविका संध्या तेरसे, ओरोसमंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल, सुप्रिया वालावलकर गोपाळ हरमलकर, भाई सावंत आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले की, भारत देशामध्ये मतदानाची टक्केवारी 1951 साली 45% होती या मतदानाच्या टक्केवारीत बदल झाला असून 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 67% एवढी झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मतदानाचा टक्का 75 टक्के च्या पुढे नेण्याचे प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे, जेवढं मतदान जास्त होतं, तेवढं तेच सुदृढ व जिवंत लोकशाहीचे लक्ष असते. हे सर्व लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाकडून नमो नवमतदार  संमेलन विशेष अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले.

युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वाखाली देशभरात 5 हजार ठिकाणी संमेलन भरविण्यात आले. या प्रत्येक संमेलनात हजार नवतरुण युवकांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ संमेलन घेण्यात आली. यामध्ये नव मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या संमेलनात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.  यामध्ये सर्वच नेत्यांनी सर्व नव मतदार युवकांना आवाहन करत आपण तर मतदान कराच मात्र इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करा असा संदेश दिला आहे..

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 ते 25 वयोगटातील सुमारे पाच टक्के नव मतदार युवक युवत आहेत. आणि या सर्वांना मतदानाचा अधिकार समजावा या हेतूने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत कुडाळ तालुक्यातील पडवे येथे राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात आला. 

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान करण्याची ताकद तुमच्या मतदानात : रणजीत देसाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 40 ते 50 हजार एवढे युवक युवती आहेत, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत आणि त्यांना पंतप्रधान करण्याची ताकद तुमच्या मतदानात आहे हात बळकट करण्यासाठी सिंधुदुर्गातील युवा पिढीने समोर येऊन मतदान करणे. व नवतरुण युवकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. यासाठी स्वतः मैदानात उतरून मतदान शंभर टक्के करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रंजीत देसाई यांनी बोलताना केले.