जिल्हा रिक्षा - चालक मालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नागेश ओरोसकर

Edited by:
Published on: January 30, 2025 19:12 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड आज येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष पदी नागेश ओरोसकर यांची तर सचिव पदी विजय कांबळी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आपल्या अध्यक्ष पदाचा वापर जिल्ह्यातील रिक्षा व्यवसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी यावेळी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक आज येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नागेश ओरोसकर, सचिव पदी विजय कांबळी, उपाध्यक्ष पदी सचिन तळेकर, संतोष सांवत, संतोष जंगले, धर्मेद्र सांवत, विजय कांबळी, कोषाध्यक्ष पदी राजन घाडी, सहसेक्रटरी पदी अविनाश पाटील, कार्यकारी सदस्य पदी प्रकाश जाधव, महेश आंबडोसकर, रविंन्द्र कांदळगावकर, रविन्द्र चिंदरकर, रविन्द्र सांवत, राजेश सरवणकर, जयवंत टंगसाळी, संदीप राणे, निलेश लुडबे, विषेश सल्लागार पदी सुरेन्द्र कोदे, संजय शारबिद्रे, राजकुमार तळेकर, सुरेश ओरोसकर, कायदेशीर सल्लागार सुहास शांताराम सांवत यांची निवड करण्यात आली आहे.