
वैभववाडी : नाधवडे गावच्या सरपंच पदी भाजपच्या लिना रमाकांत पांचाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांचं सर्वांनी अभिनंदन केले.
सरपंच पदाची सर्वांना संधी मिळावी या पक्षाच्या धोरणानुसार नाधवडे गावच्या सरपंच शैलजा पांचाळ यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेसाठी रिना पांचाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर माजी सरपंच शैलजा पांचाळ यांनी त्यांचं अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, रोहित पावसकर, प्रफुल्ल कोकाटे, श्री.कांबळी यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.