
दोडामार्ग : लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळ (नॅक) बंगळूरू च्या टीमने भेट दिली. यावेळी या टीमचे प्रमुख म्हणून निर्वाण विद्यापीठाचे, (जयपूर) कुलगुरू, प्रा. अरविंद कुमार अग्रवाल, समन्वयक डीन, अर्चेलोजी विभाग, महाराज सयाजीराव विद्यापीठाचे (बरोडा), प्रा. कृष्णन कृष्णन, सदस्य म्हणून डॉ. जस्मिन माथीयालागन माजी प्राचार्य, साराह टकर महाविद्यालयाय, (तामिळनाडू), हे सहभागी झाले आहेत.
त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. अभिजित हेगशेट्ये, उच्च शिक्षण विभाग सहसंचालक, डॉ. संजय जगताप, डॉ. कुणाल जाधव, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, पानवळ महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, स्वातंत्र्यसैनिक भाई परमेकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. हेमंत पेडणेकर, प्रा. राजेंद्र केरकर, श्री. विवेकानंद नाईक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
१४ व १५ डिसेंबर २०२३ या दोन दिवसात महाविद्यालयाने राबविलेल्या अभ्यासक्रम, अभ्याक्रमपूरक व अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रमांचा (सामाजिक सहभागाचा) आढावा घेणार आहेत. शासनमान्य व मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाचे यापूर्वीही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नॅक मूल्यांकन झाले असून त्यावेळी महाविद्यालयास ‘बी’ दर्जा प्राप्त झाला होता. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान (हॉटेल मॅनेजमेंट) हे कोर्स शिकवले जात असून महाविद्यालयाने उत्तरोत्तर प्रगती केली असून महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी बाहेर पडून वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.