एन. डी. पाटील कुटुंबीयांकडून पाट हायस्कूलला दुर्बीण भेट

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 17, 2023 18:36 PM
views 50  views

कुडाळ : एन डी पाटील कुटुंबीयांकडून पाट हायस्कूलला दुर्बीण भेट देण्यात आली. मुलांच्या मनात खगोलशास्त्राविषयी   आकाश निरीक्षणा विषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी दुर्बीण भेट दिली    आणि उपस्थित मान्यवरांसाठी खगोल निरीक्षणाविषयी मार्गदर्शनही केले.

श्री एन डी पाटील प्रशासकीय मार्गदर्शक असल्यामुळे शाळेतील विविध उपक्रम जाणून घेतले. मुलांच्या गरजा जाणून घेतल्या यावेळी कलाविषयक उपक्रमांची माहिती कलाशिक्षक संदीप साळस्कर यांनी दिली.

माडाच्यावाडी हायस्कूल मधील विविध उपक्रमांची माहिती दीपक सामंत  यांनी दिली. क्रीडा शिक्षक राजन हंजनकर यांनी क्रीडा विषयक चालणारे विविध उपक्रम समजावून सांगितले. यावेळी अमित देशमुख सॉफ्टवेअर इंजिनियर पर्णिका देशमुख सारस्वत बँक मॅनेजर पाटील मॅडम, बी एस टी ऑफिसर आणि कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे सर यांनी सर्वांचे स्वागत केले तर संस्था सचिव श्री सुधीर ठाकूर यांनी संस्थेमधून चालवले जाणारे विविध उपक्रम याची माहिती दिली    यावेळी विज्ञान शिक्षक गणित शिक्षक यांचे विविध उपक्रम जाणून घेतले यावेळी संस्था प्रतिनिधी श्री राजेश सामंत आणि विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री शामराव कोरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.