तुरळ मराठवाडीशी माझे अतुट नाते : आ. शेखर निकम

Edited by:
Published on: April 13, 2025 19:54 PM
views 150  views

संगमेश्वर : स्वर्गीय गोविंदराव निकम यांचे तुरळ मराठ वाडीशी असणारे  पन्नास वर्षापासूनचे  आपुलकीचे, तसेच आदराचे संबंध हे मी  पहात आलो असून त्यांचाच वसा घेऊन  मी सुद्धा त्याच भावनेने व मायेने या वाडीशी मनापासून लहान मोठ्या कार्यक्रमासाठी येत असतो. निकम घराणेचं  या वाडीशी व राजेंद्र सुर्वेंशी असणारे अतुट नातं  असेच पुढे चालू राहील अशा प्रकारचे भावपूर्ण उदगार  आमदार शेखर निकम यांनी तुरळ मराठवाडीतील  श्रीदेव मारुती तथा हनुमान जयंती निमित्त दर्शन  भेट दरम्यान मराठ वाडी ग्रामस्थ व श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी काढले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वें ,अनंत सुर्वे, कडवई उपसरपंच दत्ता ओकटे, तुरळचे सरपंच सहदेव सुवरे, राजवाडी माजी सरपंच संतोष भडवळकर तुरळ तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जाधव, उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडी प्रमुख भागा डिके, प्रकाश सुर्वे, सुरेश भायजे व वाडीतील ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले. गेले तीन दिवस चालू असलेला हा उत्सव अगदी गुण्या गोविंदाने संपन्न होत असतांना जन्मोत्सव,कीर्तन  सत्यनारायणाची  पूजा, हळदीकुंकू, पालखी भोवत्या, ढोलवादन हे सर्व कार्यक्रम एकोप्याने आनंदी वातावरणात पार पडत आहेत. सर्व ग्रामस्थ व मंडळ भक्तगणांचा चेहऱ्यावर उत्साह ओसंडून दिसून आला.