न.प.च्या महिला - बालकल्याण समितीतर्फे MSCIT प्रशिक्षण

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2026 17:52 PM
views 34  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे सावंतवाडी शहरातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील महिलांना व वि‌द्यार्थीनींसाठी शालेय शिक्षणा व्यतिरिक्त संगणकीय जाण प्राप्त होण्याच्या दृष्टीने दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना व विद्यार्थींना एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षण देण्यांचे ठरविण्यात आलेले.


 तसेच मुली व महिलांना त्यांच्या स्वरक्षणाच्या दृष्टीने स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यांत यावे असे ठरविण्यात आलेले आहे. वरील दोन्ही प्रशिक्षणा भाग घेवू इच्छणार-या महिला आणि मुलींनी आपली नावे नगरपरिषदेच्या परवीन शेख यांचेकडे प्रवेशफी सह अर्ज भरणा करावे. या प्रशिक्षणामध्ये जास्तीतजास्त मुली व महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले आहे