"राधाकृष्ण चषक २०२३" ; ख्याल व सवेष नाट्यगीत गायन स्पर्धच आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 14:56 PM
views 101  views

सावंतवाडी : 'श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग' या संस्थेच्यावतीने व 'स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव' यांचा सहकार्याने "राधाकृष्ण चषक २०२३" या सांगितिक महोत्सवाअंतर्गत 'शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)' व 'सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धे'चे आयोजन केले असून हा महोत्सव रविवार दि. ३० एप्रिल व सोमवार दि. ०१ मे रोजी संपन्न होत आहे. कोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले असून स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.सर्व संगीतप्रेमी मंडळींनी यावेळी उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.