विवाहित प्रेयसीच्या पतीचा खून | एकाला जन्मठेप

Edited by: ब्युरो
Published on: June 22, 2023 16:23 PM
views 134  views

बांदा : प्रेम संबंधास विरोध केल्याच्या रागातून पतीचा खून केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील एका कामगाराला आज जिल्हा न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा प्रकार बांदा येथे घडला होता. प्रेम प्रकरणातून सुखदेव यांनी मृत विश्वजीत मंडळ याच्या रात्री घरात घुसून खून केला होता. यावेळी मंडळ यांच्या मुलासह पत्नीला कोंडून ठेवले होते. याबाबतचा गुन्हा बांदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. 



ही घटना ५ जुलै २०२१ ला रात्री साडेबारा वाजता सुमारास घडली होती. याप्रकरणी सुखदेव याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. या त्याच्यावर गुन्हा साबित झाला आहे. त्यामुळे त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.