
मुंबई : मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ यादरम्यान "इंडिया मेरीटाइम विक २०२५" चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे देशाची सागरी शक्ती आणि 'ब्लू इकॉनॉमी' अधिक मजबूत व सक्षम होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंदजी सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रजी पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनजी चरण माझी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोदजी सावंत, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितपवार, मत्स व बंदर विकास मंत्री नितेश राणे आदी उपस्थित होते.










