मुंबई विद्यापीठ ,सिंधुदुर्ग उप-परीसर, सावंतवाडीत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

समाजकार्य( एम.एस.डब्लू) व माहिती तंत्रज्ञान एम.एस्सी.(आयटी) अभ्यासक्रमांचा समावेश
Edited by:
Published on: July 26, 2023 18:19 PM
views 133  views

सावंतवाडी :

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सावंतवाडी येथील मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर येथे  समाजकार्य (एम.एस.डब्लू)  व एम.एस.सी.(आय.टी.) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली असून प्रवेश नोंदणी व अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट २०२३ आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे अभ्यासक्रम‌ आहेत.


 समाजकार्य हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ७ वर्षापासून सुरु केला असून त्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर  येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

उत्तम मनुष्यबळाची गरज, सध्याची माहिती तंत्रज्ञानाची वाढती मागणी व त्यासाठीची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जिल्ह्यातील कमतरता लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून एम. एस. सी.(आय.टी.) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सिंधुदुर्ग उप परीसर, सावंतवाडी येथे सुरु केला आहे. या अभ्यासक्रमांसाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चीत करावा, असे आवाहन सिंधदुर्ग उपपरिसर मार्फत करण्यात आलेले आहे.
समाजकार्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम.एस.सी.( आय.टी.) साठी B.sc. (I.T/C.S./ BCA / Phy. / Maths. /Stats. /Electronics),B.E. पदवीधारक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
 
ही प्रवेश प्रक्रिया मुंबई विद्यापीठाच्या http://muadmission.samarth.edu.in/ या पोर्टलवर सुरु असून  अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग उप-परीसर, मुंबई विद्यापीठ, मा.बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, जिमखाना मैदान जवळ, सावंतवाडी येथे संपर्क साधावा.  एम. एस. डब्ल्यू. साठी प्रा. अमर निर्मळे ९४२३८००५०५, श्रीम. दिपाली कदम ८८७९०६४५१७ व एम.एस.सी.  (आय.टी.) साठी श्री. संदीप गोवेकर ९९६७५६९५८५ ,     श्री. विशाल पंतवालावलकर ९४२१४८७५९२ यांच्याशी  संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.