संजय आंग्रे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची घेतली भेट

ई - पिक पाहणी अ‍ॅपमधील अडचणी व भात खरेदी नोंदणी मुदतवाढीबाबत निवेदन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 13, 2026 17:21 PM
views 38  views

मुंबई : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशजी कदम यांची भेट घेऊन डिजिटल क्रॉप सर्वे (ई-पिक पाहणी) मोबाईल अ‍ॅपद्वारे पिक नोंदणी करताना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली. सध्या ई-पिक पाहणी करताना नकाशासंदर्भातील (Geo-referencing) तांत्रिक त्रुटींमुळे प्रत्यक्ष शेतात उपस्थित असतानाही मोबाईल अ‍ॅपमध्ये संबंधित गट किंवा सर्व्हे क्रमांकापासून अंतर दाखवले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना पिक नोंदणी करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दराने भात विक्री करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब यावेळी  आग्रे यांनी मंत्री कदम यांच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच खरीप हंगामातील भात पिक, आंबा, काजू इत्यादी पिकांच्या नोंदी करण्यासाठी तसेच भात खरेदी नोंदणीसाठी दिलेली मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ घेता येईल. या समस्येची गांभीर्याने दखल घेत मंत्री योगेशजी कदम यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून ई-पिक पाहणी अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली.