सावंतवाडी विधासभा मतदारसंघातील १४ रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी

आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पीय बजेट मध्ये मंजूर
Edited by: दिपेश परब
Published on: March 13, 2026 18:56 PM
views 39  views

वेंगुर्ले : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी मार्च २०२६ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार सावंतवाडी मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग व प्रमुख राज्य मार्ग रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा करणे या कामासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील प्रमुख रहदारी , वाहतुकीच्या १४ रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. 

यात सावंतवाडी ते आरोंदा रेडी रस्ता मध्ये गॅबियन वॉल बांधणे यासाठी १ कोटी, झाराप पासून आकेरी, कोलगाव सावंतवाडी आणि बांदा दोडामार्ग पर्यंत रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी ७५ लाख, सावंतवाडी ते आरोंदा रेडी रस्त्यामध्ये लहान पुलासह रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी ५० लाख, कनेडी, कुपवडे, शिवापुर, शिरशिंगे, सांगेली दाणोली, बांदा या रस्त्या मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी,  वेंगुर्ला बेळगाव रस्त्यामध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे यासाठी १ कोटी ७५ लाख, मडुरा- सातोसे- किनळे- कवठणी रस्ता मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी, आंबोली चौकूळ -तेरवण रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी, शेर्ला- कास रस्ता मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी ८५ लाख, म्हापण ते दाभोली मध्ये सुधारण व डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी, वेंगुर्ला टांक ते सागरतीर्थ रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी ३ कोटी, वेंगुर्ला- तुळस- सावंतवाडी रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे तसेच क्षतिग्रस्त मोरीची पुनर्बाधणी व संरक्षक भिंत बांधणे यासाठी १ कोटी, शिरोडा ते रेडी तेरेखोल रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी, दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी पासुन खानयाळे पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी ५० लाख, मांगेली देऊळवाडी पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी ५० लाख, तिलारी धरणा जवळील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी, वझरे तळेखोल- विर्डी पुलाचे काम करणे यासाठी १ कोटी १५ लाख असे मिळुन २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत.