
सावंतवाडी : राजघराण्याने सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमिन देण्याचा शब्द दिला होता. तो आता कायदेशीररीत्या पुर्ण झाला आहे. त्यामुळे रखडलेले हॉस्पिटल मार्गी लागण्यासाठी आता पुढचा निर्णय मंत्री दीपक केसरकर आणि शासनाने घ्यायचा आहे अशी माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.
लोकांची मागणी लक्षात घेता राजघराणे म्हणून रुग्णालयाच्या परिसरातील अर्धी जागा आम्ही शासनाला देवू केली आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्यास हरकत नाही. आवश्यक असलेला सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असे ते म्हणाले.